OverViewसुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजची सुरवात १९७५ मध्ये करण्यात आली असून आज विद्यालयामध्ये ११०० विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. आमच्या शाळा पद्धतीने चालणाऱ्या कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजचा विस्तार ५ वी ते दहावी व ११ वी , १२ वी (कला व वाणिज्य) असा झाला आहे. उत्तमोत्तम शिक्षणाबरोबरच इतर सुविधा ही दिल्या जातात. आमच्या विद्यालयाकडे सुसज्ज भव्य इमारत, प्रशस्त वर्ग खोल्या, इ-लर्निंग ची सोय, उत्कृष्ट संगणक कक्ष , त्याचबरोबर आधुनिक जगात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पुरविल्या जातात.Read More

पायाभूत सुविधा

सुसज्ज ग्रंथालय

ग्रंथालयाची इमारत भव्य आहे. ग्रंथालयामध्ये क्रमिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, नियतकालिके व दैनिके विपुल प्रमाणात आहे. ग्रंथालयाशेजारी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय करणेत आली आहे. विद्यार्थिनींच्या गरजेप्रमाणे पुस्तकांची सोय केली जाते.

संगणक प्रयोगशाळा

अत्याधुनिक सोयी -सुविधांनीयुक्त असलेली संगणक प्रयोगशाळा विद्यार्थिनींना अमर्याद आणि अद्यावत माहितीचे दालन खुले करते.शिक्षक व विद्यार्थिनीप्रिय असलेले हे ठिकाण आहे.


विज्ञान प्रयोगशाळा

विद्यार्थिनींमध्ये विज्ञान विषयाची गोडी लागणे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश समोर ठेऊन सायन्स लॅबची स्थापना केली.अद्यावत आणि सोयीसुविधांनी पूर्ण अशी आमची सायन्स लॅब आहे.


कनिष्ठ कन्या महाविद्यालयाची वैशिष्ट्ये

कनिष्ठ कन्या महाविद्यालयाचा परिसर

कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजची इमारत शहराच्या मध्यवर्ती असून मुलींच्या दृष्टीने वातावरण अध्ययन व अध्यापनास पोषक आहे. विद्यालयाची स्वतंत्र इमारत असून प्रशस्त खोल्या आहेत. आमच्या विद्यालयाकडे सुसज्ज भव्य इमारत, प्रशस्त वर्ग खोल्या, इ-लर्निंग ची सोय, उत्कृष्ट संगणक कक्ष , त्याचबरोबर आधुनिक जगात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पुरविल्या जातात.

विविध मंडळे

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभाग / मंडळे वर्षभर कार्यरत असतात.
१)सांस्कृतिक विभाग २)क्रीडा विभाग ३)सहल विभाग ४)वाड:मय मंडळ व भित्ती पत्रिके ५)मध्यान्ह भोजन समिती ६)बाल शिक्षण हक्क समिती ७)शैक्षणिक समिती ८)शाळा समिती ९)माता पालक संघ १०)तंबाखू नियंत्रण समिती ११)महिला तक्रार नियंत्रण समिती १२)शैक्षणिक गुणवत्ता विकास व वाढ समिती


क्रीडा विभाग

कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजमध्ये विपुल प्रमाणात क्रीडा साहित्य उपलब्ध आहे . यामध्ये देशी-विदेशी खेळांची साधने भरपूर आहेत. या क्रीडा विभागातून विभागीय, आंतरविभागीय तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार केले जातात. हॉकी या खेळामध्ये आमचे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजच्या विभागामध्ये तालुका व जिल्हास्तरीय खेळामध्ये सहभाग.


भरपूर सराव चाचण्या

इ. १० वी व १२ वी स्कॉलरशीप NNMS या परीक्षेच्या ५ ते ६ प्रत्येक विषयांच्या चाचण्या घेऊन प्रत्याभरण केले जाते तसेच प्रत्येकीस वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.

उत्कृष्ट निकालाची परंपरा

कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजचा निकाल प्रती वर्षी ८५% चे वरती आहेत.डिजीटल क्लासरूमची सोय

२०१७ पासून इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थिनींना डिजीटल क्लासरूमची सोयपारितोषिक विभाग

  • आनंदी आनंदा पाटील यांचे स्मरणार्थ एच. एस. सी परिक्षेमध्ये भूगोल विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस श्री. बी. के. पाटील यांचेकडून पारितोषिक व रोख रक्कम

  • श्री. संजय शंकर पाटील यांचेकडून कै. शंकर महादेव पाटील यांचे स्मरणार्थ एच. एस. सी परिक्षेत इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस पारितोषिक व रोख रक्कम

  • सौ. सुरेखा संभाजी माने-कोकाटे यांचेकडून कै. भिमराव गोविंद कोकाटे यांचे स्मरणार्थ एच. एस. सी परिक्षेत मानस शास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस पारितोषिक व रोख रक्कम

  • सौ. सुहासिनी सुर्यकांत दाभोळे यांचेकडून कै. भास्करराव बाळासाहेब देशमुख यांचे स्मरणार्थ एच. एस. सी परिक्षेत हिंदी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस पारितोषिक व रोख रक्कम

  • श्री. दादासो अंतू जाधव यांचेकडून कै.अंतू ज्ञानू जाधव यांचे स्मरणार्थ एच. एस. सी परिक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस पारितोषिक व रोख रक्कम

  • सौ. प्रतिभा ए. काळे यांचेकडून दरवर्षी गणवेशासाठी ५५०१ रुपये व माध्यमिक विभागाकडे सर्व शिक्षकांकडून गणवेश व १० वीत येणाऱ्या विद्यार्थीनींसाठी रोख रकमेची बक्षिसे .