OverView

वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी


1945 मध्ये सांगली जिल्ह्यातील माजी खासदार स्वर्गीय श्री. एस. डी. पाटील यांनी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली . महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या 34 शाखा पसरल्या असून 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1500 कर्मचारी आणि 2 लाखापेक्षा जास्त माजी विद्यार्थी सर्वत्र पसरलेले आहेत, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी हा एक महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शिक्षणसंघ आहे
आम्ही विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शाळा आणि प्रशिक्षण केंद्रे उभारली आणि आमचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला . आम्ही वेळोवेळी यशाची शिखरे सर केल्या नंतर शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये विस्तारलों तसेच विविधतापूर्ण झालो. आज आमच्या संस्थेच्या शाखा नॅक आणि आयएसओ मान्यताप्राप्त आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजची स्थापना करण्याचे ठरविले जेथे त्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक वातावरणात दिले जाऊ शकेल.