Principal Message

        महाराष्ट्राला शिक्षणाची उज्वल परंपरा लाभलेली आहे. शिक्षणातून राष्ट्रजागृती होते. शिक्षणानेच श्रेष्ठत्व प्राप्त होते. हे ओळखून महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. म . फुले , राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादींनी शिक्षणाचा पाया घातला शिक्षणाचा हाच वसा घेऊन कै. खासदार एस. डी. पाटील (काका) व त्यांच्या अनुयायांनी शिक्षणाच्या प्रसारामधून सामाजिक परिवर्तन घडविले . कर्मवीर आण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या दारात पोहोचवली. " गावात देऊळ बांधण्याऐवजी बहुजनांसाठी शाळा बांधा " हा कर्मवीर आण्णांचा संदेश प्रमाण मानून दिवंगत खासदार एस. डी. पाटील (काका) नी "बहुजन हिताय, बहुजन सुखाय " हे ब्रीद मनी घेऊन स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९४५ मध्ये वाळवा तालुका शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज संस्थेचा विस्तार वाढला असून संस्थेमार्फत पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अध्यापक विद्यालय इ.शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अशा डोंगराळ व दुर्गम भागातील ठिकाणी संस्थेने माध्यमिक विद्यालये सुरु करून तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. आमच्या सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशालेच्या कनिष्ठ महाविद्यालयाची सुरवात १९७५ मध्ये करण्यात आली असून आज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ११०० विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. आज संस्थेची धुरा संस्थेचेमानद सचिव मा .अ‍ॅड. बी. एस. पाटील (आण्णा) व युवा नेतृत्व सहसचिव मा. अ‍ॅड. धैर्यशील पाटील (बाबा) यशस्वीपणे सांभाळत आहेत.



सौ. शितल शंतनु पाटील

(मुख्याध्यपिका)

M.A, B.Ed